सातारा शहर व परिसरात एक जबरी चोरी व दोन घरफोड्या करून गेली सहा वर्षे फरार असलेला व सैदापुर चोरीतील एका अल्पवयीन चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

घरफोड्या व जबरी चोरीतील फरार आरोपी प्रतापसिह नगरात येणार असल्याची व सैदापुर येतील स्टाईल मोबाईल शॉपी फोडणारा एक अल्पवयीन गडकर आळीत राहत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. पद्माकर घनवट यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी स.पो.नि. विकास जाधव यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

विकास जाधव यांच्या पथकाने प्रतापसिह नगरात छापा टाकत फरार संशयित रोहित राजेंद्र भोसले (वय 21) रा. प्रतापसिह नगर झोपडपट्टी याला ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
त्यानंतर विकास जाधव यांच्या पथकाला सैदापुर येथील मोबाईल शॉपी फोडणारा एक अल्पवयीन गडकर आळी येथील असल्याची माहीती मिळाल्यानंतर तेथे छापा टाकत त्याच्याकडुन चौदा हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करत चोरीचा छडा लावला आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अप्पर अधीक्षक विजय पवार,पो.नि.पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.विकास जाधव, सहा.फौजदार. सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे,उत्तम दबडे, संतोष पवार, नितीन गोगावले, मुबीन मुलाणी, प्रवीण फडतरे, रूपेश कारंडे, संजय जाधव, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, विजय सावंत, मारूती लाटणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)