सातारा : पोलीस अधिकार्‍यावरील ‘ते’ आरोप तथ्यहीन?

गेल्या  आठवड्यात सातारा  पोलिस एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले. ते कारण होते मोक्कामधील आरोपी शुकराज घाडगे याचा भाऊ युवराज घाडगे याने सपोनि विकास जाधव यांच्यावर केलेले आरोप. मात्र घाडगेच्या भावाने केलेले आरोप शेवट पर्यंत टिकले नाहीत असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. त्यामूळे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विकास जाधव यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आरोप ठरलेत.

पोलिस प्रशासन हे समाजातील शेवटच्या घटकाला शांतता कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात. चुकीचे काम करणार्‍यांना कायद्याच्या चौकटीत आणत त्याला कायद्याचा हिसका दाखवतात. मात्र सध्या सातार्‍यात एका मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पाठीशी आरोपांचा ससेमिरा सुरु केला आहे. उपोषण,आत्मदहनाच्या धमक्या प्रशासनाला दिल्या जात आहेत. या दबाव तंत्राचा वापर करुन कारवाई कशी शिथील होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भुईंज पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील व मोक्क्यातील आरोपी शुकराज घाडगे (रा. तुपारी वसाहत,जि.सांगली) याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात कराड परिसरातील रेठरे येथून अटक केली. त्याच्यावरील पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे. जाणीवपूर्वक त्याला अडकवल्याचा आरोप आरोपीच्या नातेवाईकांकडुन केला जात आहे. तरीही पोलिस प्रशासन या आरोपांना भिक घालत नसल्याने आंदोलनाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली.उपोषणाची पंगत बसवली.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदने,समाजाच्या सघंटनेच्या आडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमचा व्यवसाय आम्ही प्रामाणिकपणे करतो. पोलिसांनी किसनवीर कारखान्यावर एका व्यापार्‍याला धमकावल्याप्रकरणी संबंध नसताना अटक केल्याचा आरोप शुकराज घाडगेच्या नातेवाईकांचा  आहे. पोलिसांच्या मते , मोक्का हा काही एखादं, दुसर्‍या गुन्ह्यावर लावला जात नाही. संघटीत गुन्हेगारी स्वरुपाच्या गुन्ह्यात वाढ झाल्यावरच , त्याचे रेकॉर्ड तपासून विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या मंजुरीने मोक्का लावला जातो.

हा सरळ अन साधा हिशोब शुकराजच्या नातेवाईकांना कळत नाही, की तो कळवुन घ्यायचा नाही? एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याचा न्याय निवाडा हा न्यायालयात होतो. त्याचा अधिकार दुसर्‍या कोणाकडे राहत नाही. हे अनेक गुन्हे दाखल असलेल्या शुकराज व त्याच्या नातेवाईकांना खरच माहीत नाही का? अशी प्रतिक्रीया ही पोलिसांनी व्यक्त केली.

मोक्का खोटा कसा असेल : पंकज देशमुख
एखाद्या व्यक्तीवर किरकोळ गुन्हा असेल तर तो कदाचीत चुकीने झाला असे मानता येईल. पण मोक्का हा संघटीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्यानंतरच लावला जातो. असे असताना, केवळ कारवाईतून सुट कशी मिळेल यासाठी आरोप करणे चुकीचे आहे. पुर्वीचे गुन्हे अन् गुन्हेगारी पार्श्वभुमीवरच मोक्क्याची कारवाई अवलंबुन असते. सपोनि विकास जाधव यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)