सातारा : पोलीसांची निष्क्रियता फिर्यादीसाठी विषाचा प्याला 

माण तालुक्‍यातील प्रकार ; न्याय मिळत नसल्याने फिर्यांदीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न 

बिजवडी : माण तालुक्‍यातील जाधववाडी येथील आपआपसात जमिनीचा वाद सुरू असलेल्या नात्यातीलच दोन फिर्यादींनी वारंवार दहिवडी पोलिसांकडे तक्रार करून सुध्दा न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून स्वत:चे आयुष्यच संपवण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांची हिच निष्क्रियता फिर्यादीसाठी विषाचा प्याला ठरल्याची चर्चा माण तालुक्‍यात सुरू आहे.

-Ads-

लतिका भिमराव जाधव व त्यांच्याच नात्यातील शंकर बापू जाधव यांच्यात जमिन ,घराच्या जागेवरून अनेक दिवसापासून वाद सुरू होता. दोघांनीही दहिवडी पोलीसांकडे अनेकदा जाऊन एकमेकांविरोधात फिर्याद देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दहिवडी पोलीसांच्या वेळकाढू धोरणामुळे व निष्क्रियतेमुळे फिर्यादी लतिका भिमराव जाधव व दुसरे फिर्यादी शंकर बापू जाधव यांचा मुलगा ओंकार शंकर जाधव या दोघांनीही न्याय मिळत नसल्याच्या नैराश्‍येतुन व रोजच्या भांडणांच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने दोघेही विविध हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. या सर्व प्रकरणाला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे नागरीकांतून बोलले जात असून वेळेवरच पोलिसांनी मार्ग काढला असता तर आज दोन्ही कुटूंबावर आत्महत्येची वेळ वेळ आलीच नसती अशी चर्चा सुरू आहे.

एसपी साहेब दहिवडीत स्मार्ट पोलिसींग करणार का? 
जिल्हा व राज्यात कार्यक्षम अधिकारी म्हणुन लौकीक असलेले जिल्हा पोलिस प्रमुख दहिवडीत सुरू असलेला कार्यक्षमपणाचा दुष्काळ तात्काळ हटवुन तिथे स्मार्ट पोलिसींग करणार का? असा सवाल माणवासीयांकडुन विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)