सातार्‍यातील पोलिस को. अॉप सोसायटीची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात अलंकार हॉल येथे पार पडली.

सभेच्या सुरुवातीला सभेचे अध्यक्ष जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी प्रतिमेचे पुजन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन विश्वास कडव, उपाध्यक्ष किसन कारंडे,सचिव कानिटकर यांच्यासह संचालक,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव कानिटकर यांनी केले.

संस्थेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या पोलिस पाल्यांचा जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेने पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची मर्यादा सात लाखावरुन वरुन आठ लाख केली. सभेला संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे अाभार संचालक ज्योतीराम बर्गे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)