सातारा पोलिस दलातील दोघांना राष्ट्रपती पदक

सातारा,दि.25(प्रतिनिधी)

प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या उल्लेखनिय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकांसाठी सातारा जिल्हा पोलिस दलातील दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. त्यांना लवकरच राज्यपालांच्या हस्ते पदकांचे वितरण केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उल्लेखनीय कार्यासाठी दिले जाणारे राष्ट्रपती पदक सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहन घोरपडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम देशपांडे यांना जाहीर झाले आहेत.

घोरपडे हे सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर पुरुषोत्तम देशपांडे हे कराड शहर पोलिस ठाण्यात सहाययक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. दोघांनीही उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्यांना राष्ट्रपदी पदकाने गौरवण्यात आले आहे.

पदकप्राप्त दोघांचेही जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील,कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सर्जेराव गायकवाड यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)