सातारा : पोलिसांच्या सतर्कतेमुळे लाखोंचा ऐवज परत

 

प्रवासादरम्यान एस.टी. बसमध्ये साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम बसमध्ये विसरलेल्या महिलेला सातारा बसस्थानक पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले आहेत.
अमृता दत्तात्रय काळे रा. सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे या सकाळी सहा वाजता पुण्याहून सणसरला निघाल्या होत्या. दरम्यान, त्या बारामती बसस्थानकावर आल्यानंतर नजरचुकीने इंदापूर-सातारा या एस. टी. मध्ये बसल्या.
काही अंतराने आपण चुकीच्या बसमध्ये बसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहकाला विनंती करुन त्या घाई गडबडीत त्या बसमधून खाली उतरल्या.

त्या दुसऱ्या वाहनाने सणसरकडे निघाल्या. दरम्यान, निघाल्या असताना त्यांची बॅग बसमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम फलटण बसस्थानकात फोन करुन संबंधित बसची माहिती घेतली असता ती साताऱ्याच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्षात फोन करुन त्यांनी बसस्थानक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानक पोलीस चौकीचे पो.ह. दत्ता पवार, प्रवीण पवार, अरुण दगडे, केतन शिंदे यांनी इंदापूर-सातारा बसची तपासणी करुन दागिने हस्तगत केले व अमृता काळे यांच्याशी संपर्क साधून सायंकाळी सहा वाजता त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)