सातारा : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले दोघांचे प्राण

आत्महत्येसाठी गेलेल्या दांपत्याला केले परावृत्त; महिला पोलिसाची तत्परता

घरात सूरू असलेल्या वादाला वैतागत आत्महत्या करण्यास गेलेल्या दांपत्याला पोलिसांनी परावृत्त केले. यासाठी पोलिसांना महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या जवानांनी सहकार्य केल्याने व कराड शहरच्या निर्भया पथकाच्या रेखा देशपांडे यांच्या तत्त्पतरेमुळेच दोघांचा जीव वाचला.

ओझर्डे (ता. वाई) येथील मोहन टपळे व त्यांची पत्नी निलम या दांपत्याचा घरी कुटुंबासोबत वाद झाला होता. या वादातूनच या दाम्पत्याने “”आम्ही महाबळेश्वरला आत्महत्या करायला जात आहे.” असे नातेवाईकांना सांगत ते घराबाहेर पडले होते. याची माहिती या दांपत्याच्या कराड येथील नातेवाईकांनी कराड शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस रेखा देशपांडे यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रेखा देशपांडे यांनी तात्काळ सातारा येथील नियंत्रण कक्षाला दिली.

नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्‍वर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर महाबळेश्‍वर पोलिस व ट्रेकर्सच्या जवानांनी महाबळेश्‍वरच्या विविध पॉईंटवर त्या दांपत्याचा शोध घेण्यास चालू केले. दरम्यान हे दाम्पत्य ऑर्थरसीट पॉइंटकडे जात असल्याचे महाबळेश्वर ट्रेकर्समधील एका सदस्याने पाहिले.

याची माहिती त्याने पोलिसांना व सदस्यांना दिली. पोलिसांनी अगोदरच त्या टिकाणी फिल्डींग लावली होती. त्यांनी या परिसरात दाम्पत्याचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी पोलिसांना आढळून आली. ते आत्महत्या करण्यासाठी पॉईंटच्या खाली निघाले होते. मोहन व निलम हे ऑर्थरसीट पॉईंटवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात नेहण्यात आले.

पोलिसांनी त्यांना बराच वेळ समजावत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलिसांनी दाखवलेली तत्परता व ट्रेकर्सच्या जवानांनी केलेले सहकार्य यामुळेच दोघांचे प्राण वाचले.त्यामुळे पोलिस आणि ट्रेकर्सच्या जवानांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
33 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)