सातारा पोलिसांचे ऑनलाईन टॅब झाले ऑफलाईन

  1. नागरीकांच्या अडचणीत भर; दुरूस्ती व देखभाली विना टॅब बंद

प्रशांत जाधव , सातारा 

सातारा पोलीस अधिक्षकपदाची सूत्रे घेतल्या नंतर तत्कालीन पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून सातारा पोलीस अधिक स्मार्ट बनले होते. त्यासाठी पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, उपविभागाला स्वतंत्र मोबाईल क्रमांक पुरविला होता. त्यावर इंटरनेटचीही सुविधा पुरवली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या मोबाईल क्रमांकांद्वारे व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून पोलिसांशी तातडीने संपर्क साधत होते. त्यातून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या मदतीचा हात मिळत होता. मात्र गत काही दिवसापासून जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांचे टॅब ऑफलाईन झाले आहेत.

-Ads-

तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या अभिनव कल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला होता. त्यामुळे पोलिसांशी व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून थेट संपर्क साधणे शक्‍य होते.सध्या तरुणाईसह सर्वच वयोगटांतील नागरिकांकडे इंटरनेटयुक्त मोबाईल आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांशी कनेक्‍टिव्हिटी वाढवत लोकांना अडचणीच्या वेळी तात्काळ टॅबवर संपर्क करून मदत मिळवता यावी या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम देखभाल व दुरूस्तीच्या आभावाने अपवाद वगळता बंद पडला आहे.

पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी साताऱ्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टींना बळ दिले आहे. कायद्याला अभिप्रेत असे काम करण्याचा प्रेमळ सल्ला त्यांनी एका क्राईम मिटींगमध्ये अधिकाऱ्यांना दिला. मात्र त्या प्रेमळ सल्ल्याचा परिणाम झाल्याचे काही दिसत नाही. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आता कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

एसपी पंकज देशमुख यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. ज्याचा फायदा सामान्य नागरिकांसह पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही झाला आहे. मात्र गेली अनेक दिवस केवळ देखभाल व दुरूस्तीमुळे बंद असलेल्या टॅबची माहिती त्यांना जाणीवपुर्वक दिली जात नाही.कारण तत्कालीन एसपी संदीप पाटील यांनी टॅब दिले होते,पण त्यासाठी लागणारा प्रतिमहिना       रिचार्ज  हा त्या त्या पोलिस ठाण्यांनी करावा असे आदेश दिले होते. या रिचार्जची भानगड आपल्या मागे लागू नये यासाठीच पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी टॅब बंद ठेवत असल्याचे पोलिस दलातच बोलले जात आहे.

एकीकडे झेंडा दुसरीकडे कोलदांडा
पंकज देशमुख यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर अनेक मोठे गुन्हे उघड केले. अर्थात एसपींच्या म्हण्यानुसार ते काम त्या त्या अधिकाऱ्यांनीच केले आहे. पोलिसांनी युपीत जाऊन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. तसेच साताऱ्यातील गुन्ह्यासोबत यूपीतील गुन्हा उघड करून सातारा पोलिसांचा झेंडा तिकडेही लावला. तर दुसरीकडे लोकांना तात्काळ पोलिसांशी संपर्क साधता यावा म्हणून, तत्कालीन एसपींनी सुरू केलेल्या टॅब योजनेला त्यांच्याच पोलिस अधिकाऱ्यांकडुन केवळ  रिचार्ज कुणी मारायचा म्हणून कोलदांडा घातला जात आहे.

…हे टॅब बंद आहेत
तळबीड, ढेबेवाडी,सातारा तालुका,शाहूपुरी,वाई उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,सातारा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,महाबळेश्‍वर,फलटण ग्रामीण,मेढा,पाटण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,शिरवळ,पाटण तर भुईंज,औंध,उंब्रज,कोयनानगर,बोरगाव या पोलिस ठाण्याचे टॅब सुरू आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून वापरात नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
101 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
11 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)