सातारा : पालिकेत सोयीस्कर बदल्यांचे सत्र

पदाधिकाऱ्यांचे ताल सांभाळताना कर्मचा यांची दमछाक

सातारा : सत्ताधारी सातारा विकास आघाडी मधील राजकीय पदाधिकाऱ्यांचे राजकीय ताल सांभाळताना पालिका कर्मचा यांची दमछाक होऊ लागली आहे. या राजकीय दबावाचा ताण टाळण्यासाठी पालिकेत सोयीस्कर बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या अचानक बदलांसह महत्वाचे कर्मचारी थेट रजेवर जाण्याच्या प्रकाराची पालिका वर्तुळात चर्चा आहे. मात्र या विषयाची कोंडी कोणी फोडायची हा खरा वादाचा मुद्दा आहे. सातारा पालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अधिकारी व पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे.

सातारा विकास आघाडीच्या किचन कॅबिनेटचे राजकीय अहमं कर्मचाऱ्यांना सांभाळणे अडचणीचे झाले आहे. ठराविक सर्क्‍युलर कामाचे निरोप तसेच पाठपुराव्याची पत्रे वॉर्ड फंडाची कामे यामध्ये विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना खाजगीमध्ये फैलावर घेतले जात आहे. वर्षभरापूर्वी पालिकेत सफाई कामगार भरती नंतर पालिकेत लिपिकांची कामे करणारे मुकादम माळी पंपमन यांना वॉर्डात पाठवण्यात आले . त्यामुळे पालिकेच्या कामकाजाची पूर्ण घडी विस्कटली आहे.

या चर्चेला पुष्टी देणाऱ्या घटना सध्या पालिकेत घडत आहेत नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक रवी शेलार यांची जन्म मृत्यू विभागात बदली करण्यात. आस्थापना प्रमुख अरविंद दामले यांची वसुली प्रमुख म्हणून मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी ऑर्डर काढली सहाय्यक कर वसुलीचा चार्ज सुहास पवार यांच्याकडे आहे. त्यात सभा सचिव राजेश काळे यांनाही वसुली विभागात वळवण्यात आले.

या परस्परांच्या समन्वयाच्या अभावाने वसुली विभागाचा आकडा57 टकक्‍यांनी रोडावल्याची माहिती. 9कोटीचे उद्दिष्ट व साडेनऊ कोटी थकबाकी अशा साडे एकोणीस कोटीच्या वसुलीत अवधे सात कोटी वसूल झाले. आता राजेश काळे रजेवर गेले. आणि दामलेंकडे नगराध्यक्ष स्वीय सहाय्यक पदाची जादा जवाबदारी देण्यात आली. म्हणजे प्रत्यक्षात राजकीय दबाव आणि कर्मचाऱ्यांची काम झटकण्याची मानसिकता या गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या. हा राजकीय ताण कुठेतरी कमी केला जावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
पालिकेत कर्मचाऱ्यांचे जे बदल झाले. तो प्रशासकीय कामाचा भाग आहे. वसुली विभागाची कामाची व्यत्तता लक्षात घेउन तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांची नेमणूक तिथ करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?

ज्या पालिकेत जिथे विरोधक नगरसेवकांना विचारले जात नाही तिथे बिचाऱ्या पालिका कर्मचाऱ्याची आपली अडचणं सांगण्याची काय बिशाद. जो जादा बोलतो तो पालिकेतल्या साईड ब्रॅंचला जातो हा येथील नियम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची बाजू मांडायची कोणी हा खरा कळीचा मुद्दा आहे. पालिकेत कर्मचाऱ्यांच्या चार संघटना आहेत मात्र तिथे कसे राजकारण होते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)