सातारा पालिकेतल्या समाजकल्याण समितीची गेल्या वर्षभरात बैठकच नाही

सातारा – वॉर्ड फंडाचा एकीकडे गळा आवळलेला जात असताना सातारा पालिकेतल्या समाजकल्याण समितीची गेल्या वर्षभरात बैठकच झाली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे या समितीच्या वाट्याला आलेला पंचेचाळीस लाख रुपयांचा फंड समिती सदस्यांच्या निष्क्रियतेमुळे परत जाण्याच्या मार्गावर आहे.मुख्याधिकाऱ्यांनीच राजकीय आजारपण जवळ केल्याने नक्की तक्रार कोणाकडे करायची अशी अडचणं सदस्यांची झाली आहे.

6 जानेवारी 2017 रोजी सातारा पालिकेतील सहा विषय समित्यांच्या निवडी झाल्या होत्या. आता नवीन सभापतींच्या निवडीच्या राजकीय बेरजा सुरु झालेल्या असताना मागासवर्गीय समाजकल्याण समितीची गेल्या वर्षभरात एकही बैठक न झाल्याने साताऱ्यातील दलित वस्त्यांचे किती कल्याण साधले याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सदर बझारमधील तीन प्रभागालून जाणाऱ्या तीन कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे राजकीय पिचिंग पक्ष प्रतोद निशांत पाटील यांनी उत्तमपणे केले. मात्र ज्या समितीची वर्षभर बैठकच झाली नाही त्या समितीला राजकीय मार्गदर्शन करण्यात पालिकेतल्या वकिल बाबूंनी का मार्गदर्शन केले नाही याचे उत्तर विचारायची अजिबात सोय नाही.

या समितीच्या सभापती संगीता आवळे असून या समितीचे पाच सदस्य आहेत. मात्र सताड केबिन उघडे, टेबल आणि खुर्चीवर जमलेली धूळ आणि प्रचंड राजकीय अनास्था त्यामुळे पालिकेचा समाजकल्याण विभाग हा केवळ जेवणात तोंडी लावण्यात येणाऱ्या लोणचा प्रमाणे झाला आहे. सव्वा लाख लोकसंख्येचा शहरात अठरा टक्के दलित वस्ती आहे. घरकुल योजनेत दलित बांधवांच्या पुनर्वसनाचे काय दिवे लागले हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी बैठकच न झाल्याने पडून आहे त्यावर डोळे टिपून बसलेल्या महाभागांनी तो निधी अन्यत्र पळवण्याचा घाट घातला आहे.

शहरातल्या मागास व आर्थिक दृष्टया वंचित घटकांचे पालिकेला किती घेणे देणे आहे याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. पाच समित्यांच्या तब्बल 36 बैठका झालेल्या असताना समाजकल्याण समितीने वर्षभर निष्क्रियतेच्या झोपा काढल्या. आता तरी समंजस व समयसूचक सभापती या विभागाला मिळावा अशी सातारकरांची अपेक्षा आहे.

मुळात सातारा विकास आघाडीमध्ये समन्वयापेक्षा राजकीय अहमं मोठे झाल्याने कारभाराचे ताळतंत्र सुटले आहे. ज्येष्ठ नगरसेवकांनी लक्ष घालून विषय समित्यांचे कामकाज व विकास कामांना गती द्यायची असते. इकडे समाजकल्याण सभापतींना अचूक कारभाराचे धडे न मिळाल्याने घोटाळा झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)