सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी दोन “दादां’ची चर्चा

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)- सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीला सातारा विकास आघाडीला कोंडीत पकडणारा बिनीचा शिलेदार हवा आहे. त्यासाठी अविनाश कदम व जयेंद्र चव्हाण या दोन “दादांच्या’ नावांची चर्चा सुरू झाली आहे. या दादांच्या तुलनेत काही नवीन चेहरे चर्चेत आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अजिंक्‍यतारा कारखान्यावर याचा स्वतःच आढावा घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे नक्की कोणाला संधी मिळणार याबाबतची राजकीय वर्तुळाची उत्सुकता ताणली गेली आहे.

पालिकेत 12 सदस्य असले तरी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारा सदस्य नसल्याने विरोधकांची ताकत कमी पडते . विरोधी पक्षनेते अशोक मोने यांची पालिकेत तीन दशके धुरा सांभाळली. मात्र त्यांच्या विरोधाची धार बोथट होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकसमोर ठेवूनच आ. शिवेंद्रसिंहराजे निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र निर्णय घेताना राजकीय गणितांचा विचार सातत्याने करावा लागत आहे. नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या धडाक याने पहिल्या वर्षभरात साविआ हडबडली होती. मात्र खंदारे यांची पोलिसांनी मांडलेली कुंडली सातारा विकास आघाडीच्या पथ्यावर पडली. त्यामुळे पालिका वर्तुळात स्विकृतपदासाठी दोन ज्येष्ठ “दादां’ च्या नावांची चर्चा आहे. दोन दादांच्या राजकारणाने 2014 च्या पालिका निवडणुकीत बारा नगरसेवक बिनविरोध झाले होते. अगदी साविआ विरोधात आक्रमक रणनीती आखण्यात या दादांनी कोणतीच हयगय केली नव्हती.
नगरविकास आघाडीचे अतुल चव्हाण यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे राजीनामा दिला. नगर विकास आघाडीचे एक स्विकृत सदस्य पदाची जागा रिक्त झाली आहे. पालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी साविआचे 22 तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधी आघाडीचे 12 आणि भाजपचे 6 असे सध्या बलाबल आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये एकीचा अभाव आणि नगराध्यक्षांबरोबर, उपनगराध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व मुख्याधिकारी काही नगरसेवकांचे पटत नसल्याने पालिकेचा सध्या कारभार चांगलाच गाजत आहे. सातारा विकास आघाडीत दुफळी निर्माण झाल्यामुळे नगराध्यक्षा या एकाकी पडल्या आहेत. पालिकेत अनेक मुद्दे आहेत पण, विरोधकांचा आवाज कमी पडत आहेत.
सातारा नगरपालिकेची दोन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांची स्वीकृत नागरसेवकपदी निवड केली जाईल, ही अपेक्षाही फोल ठरली. पालिका निवडणुकीत करंजे परिसरात नाविआ कमी पडली. राजकीय नुकसान भरून काढण्यासाठी तसेच या परिसरावर पकड ठेवण्यासाठी आघाडीचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी अतुल चव्हाण यांना संधी दिली. दोन वर्षापासून संधी दिलेले अतुल चव्हाण यांनी एकदाही सभागृहात तोंड उघडले नाही. याचा आमदार आघाडीला काहीच फायदा झाला नाही. त्यांना सातारा विकास आघाडीची कोंडी करण्यासाठी अतुल चव्हाण यांना राजीनामा देण्यास सांगितले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
स्किकृत सदस्यपदासाठी हर्षल चिकणे, सनी शिंदे ही अनुभवी नावे चर्चेत असली आहेत. त्याच बरोबर इंटरनेट वरून माहिती काढून सभागृहात चौकटीत बोलणाऱ्यानांही मागणी केल्याचे समजते. परंतु आ. शिवेंद्रसिंहराजे ती चुक पुन्हा करणार नाहीत अशी माहीती समोर आली आहे. सभागृहात साविआला कोंडीत पकडण्यासाठी नविआला अनुभवी मुलूख मैदान तोफ हवी आहे. विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभागृह नेते अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे सभागृहात बोलतात पण भाषेचे प्रभुत्व कमी पडत असल्याने विरोधकांवर आक्रमण करण्यास ते कमी पडतात. दोन दादांची चर्चा असली तरी आघाडीचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजेंचा निर्णय हा अंतिम मानला जातो. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात लेखी सूचना प्रांत स्वाती देशमुख यांना दिल्या आहेत . मात्र प्रांत मॅडम कामानिमित्त पुण्याला असल्याने पुढील हालचाली होऊ शकल्या नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)