सातारा पालिकेचे मुख्याधिकारी पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात

सातारा – सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्या वादग्रस्त कारभाराची प्रांत स्वाती देशमुख यांच्याकडून मंगळवारपासून चौकशी प्रक्रिया सुरु झाली. प्रांत कार्यालयाचे तब्बल 13 जणांचे पथक चौकशीसाठी दाखल झाल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.

तब्बल 14 आरोपांच्या प्रकरणांमध्ये शंकर गोरे हे दोषी असल्याचा आरोप लोकशाही दिनामध्ये झाल्याने थेट नगरविकास विभागाकडून चौकशी प्रक्रिया सुरु झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील कमिटी हॉलमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून शंकर गोरे हाजीर हो असा नारा घुमला आणि तब्बल 11 फायली आणि वेगवेगळ्या चौदा प्रकरणांमध्ये गोरेंवर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये चुकीची सेवानिवृत्ती बिले देणे सर्वे नं. 76, पेठ चिमणपुरा येथे अनधिकृत बांधकाम साशा हाऊस किपिंग या मॅनेजमेंट कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, नगरपालिकेत पुन्हा पुन्हा त्याच त्याच कामाच्या निविदा काढून जनतेच्या पैशाचा अपव्यय करणे, अवैधरित्या जमीन वाटप करुन शासनाचा महसूल बुडविणे, कोटेश्‍वर पुलाच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि सदरबझार येथील शि.स. नं. 523/अ 1 येथील मिळकतीचे बेकायदा हस्तांतरण, 22 माची पेठ येथील शौचालय सांडपाणी अडविण्यासंदर्भात तक्रार करुनही दुर्लक्ष यासारख्या अनेक तक्रारींमध्ये शंकर गोरे यांनी अक्षम्यपणे दुर्लक्ष केल्याचा ठपका वेगवेगळ्या तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने ठेवण्यात आला.

प्रांत स्वाती देशमुख यांनी गोरे यांना 11 डिसेंबर रोजी चौकशी कामाकरिता त्यांच्या दालनात उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश दिले होते. मात्र, गोरे यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने चौकशी लांबणीवर पडली. परंतु, मंगळवारी प्रांत कार्यालयाचे पथक पालिकेत दाखल झाल्याने गोरे यांची चार तास चौकशी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)