सातारा पालिकेची मंगळवारी होणारी सभा वादळी ठरणार?

सातारा, दि.19 (प्रतिनिधी) – पालिकेची मंगळवारी सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी सभागृहात होणारी सभा वादळी होण्याची चिन्हे असून सातारा शहरातील काही जमिनींची आरक्षणे रद्द करण्याच्या विषयावरुन जोरदार घमासान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नगरविकास आघाडी व भाजपा यांनी कोअर कमिट्यांच्या बैठका घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सभा सचिव म्हणून राजेश काळे पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेला सामोरे जात आहेत. या सभेत एकूण 38 विषय चर्चेला येत असून यामध्ये भवानी पेठेतील वॉशिंग रॅम्प भाड्याने देणे, कवारे कॉलनीतील आरक्षित रेखांकन रद्द करणे यासह इतर तीन विषयांवर वादग्रस्त चर्चा होणार असून सातारा विकास आघाडी या सगळ्या घडामोडींना कशी सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ऐनवेळचे विषय चर्चेला आणू नये असे फर्मान बजावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)