सातारा पालिका अतिक्रमण मोहिमेचा दणका जाहिरात फलक जप्त

सातारा – सातारा पालिकेने गुरुवारपासून अतिक्रमण मोहिमेचा दणका पुन्हा नव्याने सुरू केला. कारवाईच्या पहिल्या दिवशी तब्बल नव्वद जाहिरात फलक जप्त करण्यात आले. अतिक्रमण धारकांची या धडक कारवाईने बोलतीच बंद झाली आहे.

गिते बिल्डिंग-पोवई नाका-कामाटीपुरा ते वायसी कॉलेज परिसरात हा कारवाईची धडक मोहिम राबवली गेली. अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर, प्रशांत निकम या जोडगोळी सह बारा कर्मचारी व दोन ट्रक अशी यंत्रणा दुपारी बारा वाजता कर्मवीर पथावरील गिते बिल्डिंग येथे दाखल झाली. रस्ते व फूटपाथ वर असणाऱ्या जाहिरात फलकांमुळे नागरिकांना रस्त्यावरून धड चालणे मुश्‍किल झाले आहे याची तक्रार पालिकेच्या शहर विकास विभागाकडे सातत्याने होत होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तोंडी सूचना देऊन सुद्धा जाहिरात फलक न हटल्याने अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी थेट रस्त्यावर उतरले. रविवार पेठेत सुरवातीला काही जणांनी या मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेने रस्त्यात व फूटपाथवर येणारा प्रत्येक बोर्ड उचलण्यास सुरवात केल्यावर विक्रेत्यांची तंतरली. कामाटीपुरा व वायसी कॉलेज परिसरात ही काही जणांचा चालणारा मी पणा वाटेला लावत धडक कारवाई केली. कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाईचा इशारा प्रशांत निकम यांनी दिल्यानंतर मी, मी म्हणणारे गारठले. या दोन तासाच्या कारवाईत 87 फलक जप्त करण्यात आले. शुक्रवारी ही मोहिम आता राजवाडा परिसरात राबवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)