सातारा : पाचवडजवळ डिझेल टॅंकर पलटी

भुईंज- पुणे-सातारा महामार्गावर पाचवड, ता. वाई येथे येथे चालकाचा ताबा सुटून डिझेल टॅंकर टॅंकर पलटी झाला. यामुळे डिझेलचे लोट रस्त्यावरून वाहू लागून महामार्गावरील वाहतूक काळ ठप्प झाली होती. मात्र, सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.

याबाबत माहिती अशी, पुणे-सातारा मार्गावर पाचवड गावच्या हद्दीत सकाळी 9.45 च्या सुमारास सातारकडे डिझेल घेवून जाणारा टॅंकर उड्डाणपुल बंद असल्याने सेवा रस्त्याकडे वळत होता. यावेळी त्याचा ताबा सुटल्याने टॅंकर रस्त्यावरच पलटी झाला. यामुळे रस्त्यावर डिझेलचे लोट वाहू लागले. यामुळे अपघाताची शक्‍यता निर्माण झाली होती.

सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रस्त्यावरच डिझेलचा टॅंकर आडवा झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अपघाताची माहिती कळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी जावून टॅंकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, घटनास्थळी किसनवीर कारखानाने अग्निशमन दल पाठवले होते. रिलायन्स व आईटीडी कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)