सातारा: पांडुरंग शिंदे यांच्यावर 36 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

सातारा – सायक्‍लो ट्रान्समिशन पाटखळ ता. सातारा या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम बॅंक खात्यात न भरता परस्पर त्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी याच कंपनीचे मालक पांडुरंग रामचंद्र शिंदे यांच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाटखळ या गावी असलेली पांडुरंग शिंदे यांच्या मालकीची औषध बनवण्याची सायक्‍लो ट्रान्समिशन या कंपनीत काम करणाऱ्या दोनशे तेरा कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची भविष्य निर्वाहच्या खात्यावर न भरताच तीचा अपहार झाल्याचे भविष्य निर्वाह निधीच्या तत्कालीन परिवर्तन अधिकाऱ्यांनी 2 नोव्हेबंर 2017 रोजी कंपनीचे व्यवस्थापक व संचालक यांच्या निदर्शनास आणले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कंपनीचे एका राष्ट्रीय बॅंकेत भविष्य निर्वाह निधीचे खाते असून त्यावर कामगारांचा निधी जमा करणे आवश्‍यक असताना सायक्‍लो कंपनीने त्या खात्यावर न भरता त्या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 1 नोव्हेबंर 2013 ते 31 डिसेबंर 2017 या काळातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम 36 लाख 14 हजारांची फसवणुक केल्याप्रकरणी पांडुरंग रामचंद्र शिंदे, प्रमिला पांडुरंग शिंदे, राहुल पांडुरंग शिंदे ( सर्व रा. रामभाग्य, राधीका रोड, सातारा) व राजन दिनकर फराते रा. आसु, ता. फलटण यांच्या विरोधात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे परीवर्तन अधिकारी नितीन गंगाधर डेकाटे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)