सातारा: पसरणी घाटात विचित्र अपघात

पोकलॅंड घेवून जाणाऱ्या ट्रकला वाहने धडकली

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, तीन तास वाहतूक ठप्प

वाई वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात बुवा साहेब मंदिरापासून पाचगणीकडे काही अंतरावर एका अरुंद वळणावर शुक्रवारी सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून पाचगणीला जाणाऱ्या चारचाकी सेन्ट्रो गाडीने (एम एच.12- के.इ.1316) ओव्हर टेक करण्याच्या नादात पोकलॅंड घेवून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती कि, संपूर्ण गाडी पोकलॅंडच्या पात्यात अडकली. काही कळायच्या आत पाठीमागून येणाऱ्या दोन चारचाकी गाड्या (ऍसेंट गाडी नं.एम.एच.14-6475, व इनोव्हा गाडीनं.एम.एच 12.के.एन.1091 )एकमेकांवर आदळल्याने तीन हि गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. वाहन चालक किरकोळ जखमी झाला. तसेच ट्रकला चारचाकीची जोरदार धडक बसल्याने ऑईल टाकी लिक होवून ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळेही वाहतूक हटविताना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागले.अवजड वाहनावर चारचाकी आदळल्याने दोन्ही रस्ते काही काळ पूर्णपणे बंद झाला होते. या अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

सकाळी आकरा ते साडेआकरा वाजण्याच्या सुमारास पसरणी घाटात असा विचित्र अपघात झाल्याने पाचगणी-महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडावे लागले, सकाळची वेळ असल्याने अनेकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. अनेक एस.टी बसेस, खाजगी ट्रॅव्हल्स ही मोठ्या प्रमाणात अडकून पडल्या होत्या.दोन्ही बाजूला तीन-चार किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. पाचगणीहून येणारी वाहतूक काही काळ नागेवाडी मार्गे वाईकडे वळविण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. ऐन उन्हाच्या तडाख्यात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे प्रवाशात नाराजीचा सूर होता. पसरणी घाटात अशी अनेक अरुंद वळणे आहेत. कि ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहन चालकाला त्या वळणांचा अंदाज न आल्याने मोठाले अपघात नजीकच्या काळात झालेले आहेत. अवजड वाहनांसाठी पसरणी घाट मोठी डोके दुखी ठरत आहे. दरम्यान आ.मकरंद पाटील यांची गाडी याच वाहनांच्या ताफ्यात अडकली होती प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने वाहन हटविण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. पोलिसांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)