सातारा: पळशीत रेशीम शेतीच लाखोचे नुकसान

जाशीत महिला जखमी, घराचे पत्रे उडाले

पळशी – पळशी ( ता. माण ) परिसरात रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांने घरांचे पत्रे उडुन गेले. तसेच रेशीम शेतीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान काल झालेल्या पावसामुळे तालुक्‍यातीलच जाशी येथील एक महिलाही जखमी झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी रात्री 7 ते 9 च्या सुमारास झालेल्या वादळी वारे व पावसाने माण तालुक्‍यात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने अनेकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत. पळशी येथे अनेकांच्या पत्र्याची शेड उडुन गेली आहेत. येथील शहाजी लक्ष्मण माळवे या शेतकऱ्यांचे रेशीम शेतीचे सुमारे तीन लाख रुपयोचे नुकसान झाले आहे. त्यांचे 50 फुट लांब व 22 फुट रूंद आकाराचे शेड, रेशीमची 100 अंडी पुंज, सुमारे 60 हजार आळी, तसेच सध्या रेशीम आळी 4 थ्या मोल्ट अवस्थेत होती ते रेशीम कोषाचे 70 हजाराचे नुकसान तर शेडचे 2 लाख रुपये नुकसान असून इतर 30 हजाराचे नुकसान झाले आहे. शहाजी माळवे यांनी कर्ज काढून हा व्यवसाय चार महिन्यापुर्वीच सुरू केल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. शिवाय त्यांना अद्यापही शेडच अनुदान मिळाल नाही.

दरम्यान, माण तालुक्‍यातीलच जाशी येथील शामराव महादेव पवार यांच्या घरावरील पत्रे उडुन गेले आहेत. या घटनेत त्यांची मुलगी अर्चना बळीप ही जखमी झाली आहे. पावसामुळे 11 क्विंटल धान्यही भिजले आहेत. शिवाय टिव्ही, कुलर, फ्रिज असे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी भारती गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याशिवायही परिसरातील अनेकांच्या घरांचेही किरकोळ नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)