सातारा : परपांतिय पर्यटक युवतीचा विनयभंग

सातारा : पर्यटनासाठी साताऱ्यात आलेल्या एका परप्रांतीय युवतीचा अज्ञात युवकांनी रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकारामुळे पुन्हा एकदा साताऱ्यात येण्याऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पश्‍चिम बंगाल येथुन महाराष्ट्रात पर्यटनाला आलेली 24 वर्षीय तरुणी ही लिंब ता. सातारा येथील बारा मोटेची विहीर या ठिकाणी गेली होती. दरम्यान काही युवक तिथे आले व त्यांनी फोटो काढायचा असल्याचे सांगत त्या युवतीचा कॅमेरा घेतला होता. फोटो काढुन कॅमेरा परत करताना ओळख वाढवत तिला रस्ता दाखवण्याचा बहाणा करत तिला मुख्य रस्ता सोडुन आडरानात घेऊन जात होते. मात्र युवतीने चाणाक्षपणा दाखवत त्यांच्या मागे न जाण्याचा निर्णय घेतल्याने त्या युवकांनी तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
6 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
12 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)