सातारा : पडळ फाटा येथे भीषण अपघात ; दोन गंभीर जखमी

सातारा: खटाव तालुक्यातील मायणी गावाजवळ असलेल्या पडळ फाटा येथे आज सकाळी ७ वाजता ट्रकची स्विफ्टला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मायणी म्हसवड रोडवर पडळ फाटा या ठिकाणी ट्रक क्रं- एम एच १३ , ए एक्स ३८६१ व  कार क्रं- एम एच ४५, एन ११४१ यांची जोरात धडक झाली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. जखमी अमोल दिलीप मगर व अर्जुन शंकर माने दोघे (रा. इस्लामपूर) यांना उपचारासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)