सातारा-पंढरपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

म्हसवड, दि. 3 (प्रतिनिधी) -सातारा-पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून एका वर्षात म्हसवड हद्दीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 जणांचे हात व पाय फ्रक्‍चर झाले आहेत.

पंढरपूर ते सातारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराच्या चुकांमूळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमूळे व पर्यायी रस्त्यावर टाकलेल्या दगड मातीच्या ढिगाऱ्यामूळे दुचाकी वाहनाच्या अपघातात वाढ झाली आहे. पर्यायी रस्त्यावर फलक नसल्याने व रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने चार चाकी वाहनाचे अपघात वाढले आहेत.

या अपघाताला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवधास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करावी व संबधित अपघातग्रस्तांच्या कुठूंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मानवहितवादी संघटनेचे अध्यक्ष विजयराज पाटील, दिपक शेटे यांनी केली आहे.

माण तालूक्‍यातील रस्ते खोदले असून माळशिरस ते म्हसवड व म्हसवड ते गोंदवले या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या फंडातून सूरू आहे. या कामाचे ठेकेदारांनी उपठेकेदारांना ठेके दिले आहे. उपठेकेदार रस्ता भरणीची कामे करीत असून दुसरे ठेकेदार खोदणे व पर्यायी रस्ते करण्याची कामे करत आहेत. या ठेकेदारात समन्वय नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. वाहने रस्त्यावर जाताना उडलेल्या धूळीमूळे वानाचे अपघात होत आहेत. अपघातास कारणीभूत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

याबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन दिले असून या रस्त्यावर संरक्षण भीती व फलक न लावल्यास कारवाई करू असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. मात्र, संबधित ठेकदार हे मूद्दाम दूर्लक्ष करत असून हे रस्ते राष्ट्रीय रस्ते विकास मंडळाच्या अधिकारात आसल्याने स्थानिक प्रशासनाच्या आदेशाची दखल घेत नाहीत. रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुम टाकला असून वाहतूकीस अडथळे केले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा खासगीलोकांनी अतिक्रमणे केलेली आहे त. ही अतिक्रमणे काढून टाकावीत अशी मागणी करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)