सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम रखडण्याची चिन्हे

पिंगळी : पिंगळी ते गोंदवले दरम्यानचे चौपदीकरणाचे बंद असलेले काम.

पिंगळीनजिकचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले : ठेकेदाराचीही बिले थकली

दहिवडी, दि. 7 (प्रतिनिधी) – सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम पिंगळीनजिक बंद असल्याने वाहतुकीला अडथळा होवू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मुरमाचे पैसे तसेच कामासाठी घेतलेल्या वाहनांच्या वाहतूकीचे पैसे ठेकेदारांनी दिले नसल्याने बिले मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी व वाहन धारकांनी घेतला आहे. तर बिले न मिळाल्याने तीन महिन्यापासून ठेकेदारांनीही काम बंद ठेवले आहे.
सातारा पंढरपूर हायवेचे काम मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सुरू आहे. हे काम मुख्य ठेकेदाराकडून दुसऱ्या ठेकेदारांना देण्यात आले व त्यांनी देखील पाच पाच किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांना कामे दिली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दंडिलशाही तर अनेक ठिकाणी काम बंद करण्याची वेळ हायवे ठेकेदारांवर आली आहे. पिंगळी ते गोंदवले असे काम करणाऱ्या ठेकेदाराने तालुक्‍यातील अनेक वाहनचालकांना व शेतकऱ्यांना गंडा घालून पळ काढला आहे. टॅंकरने पाणी मारणारे तसेच संबंधित कामाला मुरूम टाकणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे देखील दिले नाहीत.
ठेकेदारांनी दिलेले धनादेश हे बॅंकेने संबंधित खात्यात रक्कम नसल्याने माघारी केले आहेत. यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी व वाहनचालकांनी या कामाला विरोध केला आहे. जोपर्यंत आमची रक्कम आम्हाला मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याठिकाणी काम सुरू करण्यासाठी अनेक राजकीय नेते, गावा-गावातील छोटे मोठे ठेकेदार यांना पुढे करून काम सुरू करण्याचे प्रयत्न होत आहे. मात्र, येणाऱ्या मशिनरी व वाहने शेतकरी व नागरिक हाकलून लावत आहेत. या प्रश्‍नावर मुख्य ठेकेदार व प्रशासनाने लक्ष न दिल्यास हे काम असेच रखडणार आहे.

कोट
ठेकेदाराने शेतकरी व वाहन चालक यांचे 35 ते 40 लाख रुपये बुडवले आहेत. मात्र, याठिकाणी कंपनी व ठेकेदारांकडे लक्ष देत नसल्याने काम तीन महिन्यांपासून अधिक काळ बंद पाडण्यात आले आहे. आमची बिले मिळेपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही.
– सचिन जाधव, वाहन चालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)