सातारा नगरपरिषद कर्मचारी मारहाणीचा विशेष सभेत निषेध

सातारा – सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेत प्रशांत निकम यांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवताना शहरातील सर्व अतिक्रमणे काढा, कोणाची गय करु नका अशा सूचना मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिल्या. फळ विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीबाबत सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेऊन आपला निषेध नोंदवला. त्यानंतर विशेष सभा आयोजित करून आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.पोलीस अधीक्षकांना यानंतर घटनेचे तसेच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, नगरपालिका कर्मचारी आपले काम करत असताना त्यांना मारहाण करणे व कायदा हातात घेणे चुकीचे आहे. कोणत्याही पद्धतीने अशा घटनांना पाठीशी घातले जाणार नाही. बेशिस्त कारभार करून देखील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. जेणे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. पालिका कोणाच्याही विरोधात नाही. सातारा शहरातील अतिक्रमणे काढायला सुरुवात करावी व पालिकेला नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, काल घडलेल्या मारहाण प्रकरणाची कायदेशीर बाब पूर्ण केली आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीबाबत 353 कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकार अशा वेळी, अशा घटनांच्या वेळी आपल्या सोबत असते. प्रशासन कमी पडणार नाही पुन्हा असे कृत्य घडू दिले जाणार नाही. आम्ही सर्वजण निकम यांच्या पाठीशी आहोत, असे ही गोरे म्हणाले.

धनंजय जांभळे म्हणाले, सातारा शहरात सर्वत्रच अतिक्रमणे बोकाळली आहेत. याबाबत अनेकवेळा पाठीशी घालण्याचे काम होत असते, अशी टिका केली. यावेळी  भाऊसाहेब पाटील, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.

विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ
प्रशांत निकम यांना फळविक्रेत्यांनी मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. निकम या मारहाणीत गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध करत पालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले. गुरुवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी केली. मुजोर फळविक्रेत्यांना आता अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी आंदोलनस्थळी नगराध्यक्षा माधवी कदम, भाजप नगरसेवक धनंजय जांभळे वगळता सत्ताधारी, विरोधक नगरसेवक फिरकले सुध्दा नाहीत. विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

मी तुमच्या सोबत ः पंकज देशमुख
तुम्ही निःष्पक्ष कारवाई करा मी तुमच्या सोबत नक्कीच राहीन. यापुढे कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा तुम्हाला कायमस्वरूपी देण्यात येईल. अशा घटना निंदनीय आहेत. शहरात अतिक्रमण वाढली आहेत हे दिसते आहे. मात्र त्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी निःष्पक्षपातीपणा हवा आहे. त्यासाठी मी माझी सर्व यंत्रणा तुम्हाला सहकार्य करेल, असा विश्‍वास यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)