सातारा: दैनिक प्रभातवर शुभेच्छांचा वर्षाव

कराड - दैनिक प्रभातच्या कराड विभागीय कार्यालय शुभारंभप्रसंगी शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. समवेत दैनिक प्रभातचे जनरल सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, निवासी संपादक मुकुंद फडके, ब्युरो मॅनेजर जयंत काटे, मनोहर शिंदे, अमित शिंदे, उमेश सुतार. (छाया : राजू सनदी)

विशेषांकाचे कौतुक

दै. प्रभातच्या कराड विभागीय कार्यालय शुभारंभ प्रसंगी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांनी कौतुक करून स्वागत केले. या पुरवणीच्या माध्यमातून कराड-पाटणची खऱ्या अर्थाने ओळख झाल्याचे अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या.

दिमाखदार सोहळ्यात कराड कार्यालयाचा शुभारंभ

कराड -मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात सुमारे 87 वर्षे आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या दैनिक प्रभातने संस्कृतीसंपन्न आणि चारित्र्यवान पत्रकारितेचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर ठेवला आहे. त्याच उद्देशाने नुकतेच सातारा जिल्ह्यात पदार्पण केले आहे. आता कराड-पाटणमधील वाचकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रभातच्या विभागीय कराड कार्यालयाचा शुभारंभ मोठ्या दिमाखदार सोहळ्याने व मान्यवरांच्या शुभेच्छाने संपन्न झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगांवकर, फारूक पटवेकर, किरण पाटील, विद्या पावसकर, गजेंद्र कांबळे, अतुल शिंदे, राजेंद्र माने, मलकापूरचे उपनगराध्यक्ष

मनोहर शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. निर्भिड, नि: पक्षपाती आणि संतुलित वृत्तांकन हे प्रभातचे वैशिष्ट्य आहे. याच उद्देशाने प्रभातने सातारा जिल्ह्यात पदार्पण केले आहे. वाचकांनी ही मनापासून स्वागत केले आहे. कराड-पाटण भागातील वाचकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी कराड येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी कराड-पाटण तालुक्‍यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून प्रभातला शुभेच्छा दिल्या. यामध्ये बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य जे. एस. पाटील, ऍड. संभाजी मोहिते, पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी डी. एस. थोरात, प्रियदर्शनी उद्योग समुहाचे संस्थापक अशोकराव पाटील, माजी नगरसेवक प्रकाश जाधव, उद्योजक योगेश पाटणकर, माजी नगरसेवक घन:शाम पेंढारकर, इंद्रजित चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड, वाहतुक शाखेचे प्रदिप खाटमोडे, सहाय्यक महिला पोलिस निरिक्षक दिपीका जौंजाळ यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)