सातारा: देवदर्शनाहून परतणाऱ्या महिलेचा अपघातात मृत्यू

सातारा – देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भरधाव ट्रॅक्‍सने बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. चांदबाई बाळकू डोंगरे (वय , रा. करोशी, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

शिर्डी, शनी-शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणांहून देवदर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या ट्रॅक्‍सने सातारा शहरानजीक बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला जोरात ठोकर मारली. पहाटे पाच वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौकात ट्रॅक्‍सचा टायर फुटल्याने वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली . ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्‍सच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला ट्रॅक्‍स्समध्ये एकूण दहा प्रवासी होते. महा मागावर काचांचा आणि रक्ताचा सडा पडला होता.
या अपघातात ट्रॅक्‍समध्ये बसलेल्या चांदबाई बाळकू डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुक्‍मिणी डोंगरे, नीता डोंगरे, सूरज डोंगरे, मंजुळा डोंगरे (सर्व रा. करोशी, चिक्कोडी) जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)