सातारा शहरातील भूविकास चौकात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. शाहूपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विनायक मानवी यांनी त्या चोरट्याचा थरारक पाठलाग केला. दरम्यान पकडलेल्या चोरट्याने आणखी काही गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे.

भूविकास चौकातील हॉटेल आंबेसेटर परिसरात विनायक मानवी हे वाहतूक नियम करत होते. त्यावेळी तो चोरटा एका दुचाकीचे लॉक तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यावेळी त्यांनी त्याला हटकले. तेव्हा मानवी यांना पाहताच चोरट्याने धूम ठोकली. यावेळी विनायक मानवी यांनी चोरट्याला थरारक पाठलाग करून पकडले. दरम्यान, त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने आणखी काही गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे.

आयुब आरिफ शेख (वय 27) रा. पाचवड ता. वाई असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याने सुमारे दीड वर्षापुर्वी काही गाड्या चोरल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन गाड्या जोशी विहीर येथील एका भंगार व्यवसायीकाला विकल्याचे समोर आले आहे. तसेच चोरलेल्या गाडया पैकी एक गाडी त्याने अवघ्या 6 हजार रुपयाला विकली आहे.

दरम्यान दि. 13 ऑगष्ट रोजी त्याने सातारा शहरातील एक दुचाकी चोरल्याची कबुली देत , चोरलेली ती दुचाकी त्याने वाई येथे लपवली असल्याची कबुली दिली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपासासाठी शाहूपूरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शेलार यांचे पथक वाईत दाखल झाले आहे.

दरम्यान विनायक मानवी यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चोरटा पकडल्याने घटनास्थळी असलेल्या  नागरिकांनी, शाहूपुरीचे पो.नि. किशोर धुमाळ, चंद्रकांत बेदरे, स.पो.नि. पुष्पा किर्दत, स.पो.नि. शेलार यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)