सातारा : दहिवडी आगारप्रमुखपदी माणची कन्या

दहिवडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दहिवडी आगारप्रमुख म्हणुन मोनाली पाटील यांची नियुक्ती झाली आहे, त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असुन त्या दहिवडी आगाराच्या प्रथम महिला आगारप्रमुख ठरल्या आहेत.

मोनाली चंद्रकांत पाटील या माण तालुक्‍यातील झाशी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत पाटील यांची कन्या आहेत.
मोनाली यांच्या रूपाने ग्रामीण भागाची माहिती असणारा अधिकारी मिळल्याने माण तालुक्‍यातील ग्रामीण भागात लालपरी वेळेत धावताना दिसेल यात शंका नाही. या पुर्वी परिविक्षाधीन आगारप्रमुख म्हणून एक वर्ष इंदापुर येथे त्यांनी उत्कृष्ठपणे काम पाहिले आहे. त्याच अनुभवाचा उपयोग पाटील यांना दहिवडीत काम करताना करावा असे सांगत मावळते आगारप्रमुख कानतोडे यांनी त्यांचे स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)