सातारा : दहा लाखाच्या फसवणुकीचा पोलिस पती पत्नीवर गुन्हा

मित्राकडून उसने घेतलेले पैसे परत न करता त्याची फसवणूक केल्याप्रकरणी पती,पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. उसने घेतलेले पैसे परत देता येत नसल्याने स्वत:च्या फ्लॅटवर पूर्वीचे कर्ज असतानाही विकल्याची व त्याबदल्यात 10 लाख 11 हजाराच्या फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणात संशय असलेले आरोपी हे पोलिस दलात नोकरीस असल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी महारुद्र ज्ञानदेव कानडे ( रा. गोडोली ) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयीत आरोपी राणी विष्णु मोहिते व तक्रारदार हे दोघे मित्र आहेत. त्या ओळखीचा फायदा घेत राणी हिने दि. 16 सप्टेंबर 2016 रोजी तक्रारदाराकडून 7 लाख रुपये उसने घेतले होते.

त्यावेळी संशयीत आरोपी असलेला तिचा पती सचिन धनाजी फाळके हा तिच्या सोबत होता. त्यानंतर तक्रारदाराने राणी व तिचा पती सचिन यांना वेळोवेळी पैशाची मागणी केली . मात्र त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर संशयीतांनी तक्रारदार यांना आमचा गोडोली येथे फ्लॅट आहे. तो तुला विकत घे व बाकी पैसे तुच आम्हाला दे असे सांगीतले. त्यानुसार त्या फ्लॅटची किमंत 13 लाख रुपये ठरली होती.

आरोपींनी आगोदरच 7 लाख घेतले असल्याने तक्रारदार यांनी उर्वरीत 6 लाख देण्याचे ठरले होते. त्यापैकी 35 हजार सचिन याचा मित्र अमोल सूर्यवंशी याच्या बॅंक खात्यावर व प्रत्यक्ष सचिन याला दिले. बाकी 2 लाख 66 हजार रुपये सचिन याच्या बॅंक खात्यावर जमा केले होते.

त्यानंतर दि. 22 डिसेंबर 2016 रोजी त्या फ्लॅटचे तक्रारदार कानडे यांना आरोपींनी साठेखत करून दिले होते. साठेखत झाल्यानंतर कानडे त्या फ्लॅटवर राहयला गेले होते. तेव्हापासुन कानडे यांनी आरोपींना खरेदीखत करण्याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दि. 19 मे 2018 रोजी एलआयसी चे अधिकारी कानडे यांच्या घरी गेले. त्यांनी ते राहत असलेल्या फ्लॅटवर 16 लाखाचे कर्ज व त्या कर्जापोटी 2 लाख 87 हजाराचे व्याज थकल्याची माहिती दिली.

त्यानंतर कानडे यांनी आरोपींना विचारणा करत काही देणी,घेणी असतील तर पूर्ण करून फ्लॅट नावावर करण्याचे सांगितले. त्यावेळी आरोपींनी आम्ही पोलिस आहोत तुला जे करायचे ते कर असा दम दिला. वेळोवेळी फ्लॅट नावावर करण्याची विनंती करूनही आरोपी टाळाटाळ करत असल्याचे महारूद्र ज्ञानदेव कानडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास स.पो.नि ढेकळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)