सातारा : दत्ता जाधव टोळीतील पप्पू घुलेला अटक

 

साताऱ्यातील  गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील व पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या पप्पू घुलेला अखेर अटक झाली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतला आहे. साताऱ्यात विविध गुन्हे करून करून फरार असलेला दत्ता जाधव जत मध्ये असल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर तत्कालीन परिविक्षाधीन एसपी पवन बनसोड यांनी जत येथे येथे छापा टाकला होता. त्यावेळी यात्रेच्या कार्यक्रमात असलेल्या दत्ता जाधव व त्याच्या टोळीने सातारा पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. ही घटना जुलै महिन्यात घडली होती.

त्यानंतर पोलिसांनी दत्ता जाधव याचा भाऊ युवराज याला व काही लोकांना अटक केली होती. तर बाकी लोक फरार झाले होते. त्यातील सुरज उर्फ पप्पू घुले रा. गोडोली हा पोलिसांच्या रडारवर होता. त्याला शोधण्यासाठी सांगली पोलिसांनी साताऱ्यात अनेकवेळा छापे टाकले होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने त्याला शुक्रवारी पकडला. दरम्यान पप्पू घुले हा साताऱ्यात त्याच्या साथीदारांच्या मदतीने पिस्तूल विक्रीसाठी आला होता. पप्पू घुले सोबत काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)