सातारा …”त्या” मुख्याध्यापकावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा

भाजपाचे शहराध्यक्ष सुनिल काळेकर व सेनेचे हरीदास जगदाळे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या मुख्याध्यापकावर विनयभंगाचा दुसरा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

अमोल कोळेकर याने तो काम करत असलेल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तु मला आवडतेस माझ्यासोबत मैत्री कर असे म्हणत तिचा हात पकडला होता.

व तु माझ्यासोबत मैत्री केली तर तुझ्या मुलाच्या शाळेचा सगळा खर्च मी करेन असे म्हणत विनयभंग केल्याची तक्रार हरिजन गिरीजन सोसायटी,सातारा येथे राहणाऱ्या महिलेने तब्बल तीन वर्षांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली असुन अधिक तपास महिला पो.हवा . निलम सुर्यवंशी या करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)