सातारा : ” त्या” पोलिसाच्या पाठीवर एसपींची कौतुकाची थाप

गुरूवारी केला चोरट्याचा थरारक पाठलाग; विनायक मानवी यांना पाच हजाराचे पारितोषिक

 

सातारा शहरातील भूविकास बॅंक चौकात दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा पाठलाग करून पकडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पाठीवर एसपींनी कौतुकची थाप दिली. शाहूपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विनायक मानवी यांनी गुरुवारी चोरट्याचा थरारक पाठलाग करत त्याला जेरबंद केले होते. याप्रकरणी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी त्यांना पाच हजाराचे पारितोषिक देत त्यांचे कौतुक केले.

याबाबत अधिक माहिती अशी, भूविकास बॅंक चौकातील हॉटेल अँबेसेडर परिसरात विनायक मानवी हे गुरुवारी वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आयुब आरिफ शेख (वय 27) रा. पाचवड ता. वाई हा चोरटा एका दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्याला हटकले.

मानवी यांना पाहताच चोरट्याने धूम ठोकली. यावेळी विनायक मानवी यांनी जिवाची परवा न करता त्या चोरट्याला पाठलाग करून पकडले होते. दरम्यान, त्यांनी अधिक चौकशी केली असता त्याने आणखी काही गाड्या चोरल्याची कबुली दिली . या घटनेची जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी दखल घेतली.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी विनायक मानवी यांना पाच हजाराचे पारितोषिक दिले. त्यासोबतच मानवी यांची आस्थेने विचारपुस करत गुरुवारच्या घटनेत तुम्हाला काही इजा झाली नाही ना? गाव कोणते? असे विचारले. मला तुमच्या सारख्या जवानांचा अभिमान आहे. अशी कौतुकाची थाप मानवी यांच्या पाठीवर एसपींनी टाकली. या घटनेची पोलिस दलात चर्चा सुरू असून एसपींच्या या भूमिकेमुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल  वाढले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
327 :thumbsup:
392 :heart:
3 :joy:
20 :heart_eyes:
53 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)