कराड – कोल्हापूर नाका येथील गांधी पुतळ्याशेजारी पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा गणवेश घालून फिरत असताना एका तोतया पोलिसास सोमवारी ताब्यात घेतले होते. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेश सुरेश चव्हाण (वय 26) रा. वडगाव हवेली, ता. कराड असे तोतया पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, कोल्हापूर नाका येथील गांधी पुतळ्याशेजारी पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासविण्यासाठी खाकी रंगाचा पोलीस गणवेश त्यावर दोन्ही बाजूला पंचकोनी स्टार असल्याचे कपडे, बेल्ट घालून फिरत असताना कराड शहर पोलिसांनी निलेश यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन वेगवेगळ्या नेमप्लेट मिळून आल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सातारा, सांगली जिल्ह्यातील चार दुचाकी चोरुन विकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)