सातारा: तळपत्या सूर्यापुढे सफेद निशाण

उन्हाळी वस्तूंचे दर
टोप्या 50 ते 250 रुपये, सनकोट 100 ते 250 , गॉगल 120 पासून पुढे, स्कार्फ स्टोल 100 ते 150, हॅंड ग्लोज 100 ते 130, पांढरे टी शर्ट 150 रुपयांपासून, होजिअरी 250 ते 400 रुपये असे दर बाजारपेठेत आहेत. यासह उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू दाखल झाल्या आहेत.

उन्हाच्या संरक्षणासाठी विविध फंडे : बाजारपेठेत उलाढाल

परळी : तळपत्या सूर्यापुढे पांढरे कापड फडकावून शरणागती पत्करावी, तसे चित्र आता सगळीकडे दिसू लागले आहे. एप्रिलच्या उन्हापासून संरक्षणासाठी पांढरे कपडे आणि संरक्षण साहित्यासह गॉगल्सची उलाढाल वाढली आहे. कॉलेज तरुण-तरुणींमध्ये स्टाईल जपतानाच उन्हापासून संरणक्षासाठी वेगवेगळ फंडे दिसताहेत. त्यामुळे बाजारात चांगलीच लगबग आहे.

-Ads-

ग्रामीण भागासह जिल्ह्यात पारा कधीच पार गेला आहे. तो वाढत जाणार आहे. गेल्यावर्षी ते अंश इतके तापमान राहिले होते. यावर्षी तापमान तेवढेच राहील, असा हवामानाचा अंदाज आहे. त्याच्या झळा आताच जाणवू लागल्या आहेत. सकाळ नऊपासूनच उन्ह चटका देऊ लागले आहे. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना शक्‍यतो पांढरे कपडे वापरावीत, या सरळ सूचनेचा अंमल सुरू झाला आहे. महिलांमध्ये साड्यांचे विविध रंग, पंजाबी ड्रेस किंवा कॉलेज, शाळेचा गणवेश रंगीत असेल तर त्यांना सनकोटचा पर्याय आहे.पांढऱ्या रंगाचे, मात्र त्यावर अन्य हलक्‍या रंगाचे नक्षीकाम असलेले सनकोट महिलांत खास आकर्षण आहेत. उन्हामुळे त्वचेला संरक्षण देणाऱ्या विविध क्रीमची खरेदीही वाढली आहे.

कपड्यांमध्ये वेगवेगळी फॅशन यावर्षी पाहायला मिळते आहे. क्‍लासिक लूक देणारे शर्ट, तरुणींसाठी कुर्ते बाजारात दिसत आहेत. टी शर्ट, थ्री-फोर्थची खरेदी वाढल्याचे महेश शहा यांनी सांगितले. पल्लाझोपासून ते स्कार्फपर्यंत प्रत्येक या कपड्यातून एक वेगळी स्टाईल जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुती कपड्यांना मागणी जास्त आहे. कॉटन, शिफॉन, लेस फॅब्रिक अशा अनेक प्रकारांच्या कपड्यांचा वापर वाढला आहे. युवतींची कॉटन स्कार्फला पहिली पसंती आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)