सातारा: तडीपार गुंडाला अटक

सातारा – गोडोली परिसरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तडीपार गुंडाला तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.सातारा शहरातील शाहूपुरी या उपनगरात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या मंगेश जगताप याला जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्यातुन तडीपार केले होते. मंगळवारी रात्री मंगेश जगताप हा तडीपारी आदेशाचा भंग करून गोडोली परिसरात फिरत असल्याची माहिती स.पो.नि. श्रीकृष्ण पोरे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावत पोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत स.पो.नि. पोरे यांनी जगताप याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)