सातारा : डॉल्बीमुक्त जयंती साजरी करून आदर्श समाजापुढे ठेवावा

आढावा बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुखांचे सर्व मंडळांना आवाहन

वाई: सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश असेलेली समिती स्थापन करून एकच डॉब्लीमूक्त व व्यसनमूक्त आगळी वेगळी मिरवणुक काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवजयंती उत्सव सामुदायिक साजरा करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला.

ग्रंथ दिंडी, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, थोर महापुरूषांचे विचार फ्लेक्‍स व सोशल मिडीयाच्यामाध्यमातून पोहचविण्यासाठी विधायक उपक्रम राबविण्याचा वाईकरांनी घेतलेला हा स्तुत्य निर्णय सातारा जिल्हयालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारा ठरेल, असा विश्वा स जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्त मंडळासाठी पाच हजारांचे बक्षीसही यावेळी पाटील यांनी जाहिर केले.

-Ads-

वाई उपविभागीय पोलीस कार्यालयाच्यावतीने आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अस्मिता मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, तहसिलदार अतुल म्हेत्रे, नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, वाई ही सांस्कृतिक राजधानी आहे. वाईने नेहमीच राज्याला नवी देण्याची दिशा देण्याचे काम केले आहे. महापुरूषांचे आचार विचार समाजापुढे कायम रहावेत यासाठी जयंती, स्मारक व पुतळे उभारले जातात. या जयंती सोहळयात दारू पिऊन धांगडधिंगा करण्यापेक्षा तरुणांनी आपल्या मित्राच्या लग्नात नाचण्याची हौस पुर्ण करावी.

सायबरसेल विभागात व्हॉटस्‌ ऍप व फेसबुकवर लक्ष ठेवण्यासाठी मॉनीटरींग यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सोशल मिडीयावर तरुणांनी भावनेच्या आहारी जावून चुकीच्या पोस्ट टाकू नयेत अथवा फॉरवर्ड करू नयेत. अशांवर गुन्हे दाखल झाल्यास नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक तसेच चांगल्या पध्दतीने करावा. विविध जाती-धर्माचे समाज व राजकिय पक्षांचा असलेला भारत देश एकसंघ रहावा यासाठी संविधानानेच अखिल भारतीय सेवेचीनिर्मिती केली असून समाजात कायदा सुव्यवस्था राखणे हे आयएएस व आयपीएस अधिकार्यां चे कर्तव्य असते.

उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके म्हणाले, शांतता कमिटीच्या यापूर्वी झालेल्या बैठकित सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येवून उत्सव समिती तयार केली असून व्यसनमूक्त, डॉल्बीमूक्त मिरवणुक काढण्यात येणार आहे. दारू पिणाऱ्यास मिरवणुकीत सामिल होता येणार नाही. आंबेडकर व शिवाजीराजांचे आचारविचार लहान मुलांमध्ये रुजण्यासाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकरांच्या सर्व ग्रंथाच्या नावाच्या यादीचा फ्लेक्‍स व त्यांचे विचारांचे फ्लेक्‍स यावेळी शहरात लावण्यात येणार आहेत.

प्रांताधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, या आगळया वेगळया उपक्रमांकडे जिल्हयासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे. वाईने बदलत्या काळाला अनुरूप चांगले विचार समाजाला देण्याचे काम केले आहे. ही आगळी वेगळी जयंती वाईकर जोशाने व निर्विघ्न साजरी करतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते विशाल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नितीन कांबळे यांनी भारतीय संविधानाची पुस्तकाची प्रत संदीप पाटील यांना भेट दिली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी स्वागत केले. संदीप प्रभाळे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.

कार्यक्रमास नगरसेवक राजेश गुरव, महेंद्र धनवे, धनंजय हगीर, दीपक ओसवाल, अविनाश फरांदे, दत्तात्रय खरात, भानुदास आगेडकर, राजाभाऊ खरात, श्रीकांत निकाळजे, अप्पा मालुसरे, अजित इनामदार, स्वरुप गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब एडगे, संदीप जायगुडे यांच्यासह वाई, पाचगणी, जावलीतील विविध मंडळांचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)