कोरेगाव- कराडच्या डॉ. दौलतराव आहेर महाविद्यालयात झालेल्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सातारा विभागीय कब्बडी स्पर्धेत कोरेगांवच्या डी. पी. भोसले कॉलेजने चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

रयत शिक्षण संस्थेच्या व क्रीडा क्षेत्रात संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या डी. पी. भोसले कॉलेजने अंतिम सामन्यात रेठरे बु।। येथील शिवनगर महाविद्यालयावर मात करून विजेतेपद मिळविले. 28 संघांचा सहभाग असलेल्या व अतिशय रोमहर्षक झालेल्या स्पर्धेत डी. पी. च्या खेळाडूंनी साखळीतील सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली होती. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात चमकदार कामगिरीच्या जोरावर डी. पी. च्या खेळाडूंनी रेठरे महाविद्यालयावर मात करत विजेतेपद पटकावले.

डी. पी.च्या संघाला विभागीय चॅम्पियन चषकासह विद्यापीठ चषक देवून गौरवण्यात आले. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक प्रा. बी. डी. भोसले, एम. बी. मुजावर, प्रशिक्षक अक्षय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले, विजेत्या खेळाडूंचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)