सातारा: जुगार अड्ड्यावर छापा : 5 जण ताब्यात

कराड – आगाशिवनगर, ता. कराड येथे डोंगराकडेला सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले तर दोनजण तेथून पळून गेले. आज सोमवारी दि. 16 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सहा हजार रुपयांची रोकड व दुचाक्‍या जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगाशिवनगर येथे डोंगराच्या पायथ्याला तीन पानी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांना समजली. त्यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्याठिकाणी धाड मारली असता सुमारे सात जण तीन पानी जुगार खेळताना आढळून आले. पोलीस धाड मारताच तेथील दोघांनी पलायन केले. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, सहा हजार रुपयांची रोकड व दुचाक्‍या पोलिसांनी जप्प्त केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)