सातारा जिल्ह्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज

संग्रहित छायाचित्र...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे दि. 23 रोजी भूमिपूजन

सातारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाशर्वभूमीवर सातारा जिल्ह्यासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 23 डिसेंबरला येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री डिजिटल कळ दाबून एकाच वेळी सहा महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचीही यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने भाजपच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आखण्यात आलेल्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पवार, भरत पाटील, महेश शिंदे, अनिल देसाई, नगरसेवक मिलिंद काकडे, सिध्दी पवार, धनंजय जांभळे, विजय काटवटे यावेळी उपस्थित होते.

जलसंधारण, राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम या तीन सरकारी विभागाचा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला असून यानिमित्ताने दहा हजार कोटी रुपयांच्या निविदा यापूर्वीच अंतिम करण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याचे सहा किलोमीटरच्या विस्तारीकरणासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे मजबूतीकरण व राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण या दहा हजार कोटींच्या कामांना केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे.

गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, साताऱ्याचे संपर्क मंत्री गिरीश बापट यांची उपस्थिती असणार आहे. खंबाटकी बोगद्याचे पुणेकडून साताऱ्याकडे येताना सहा किलोमीटर बोगद्याच्या सहापदरीकरणासाठी 921 कोटी रुपये, पोलादपूर दहिवडी रस्त्यासाठी साडेतेरा कोटी रुपये, गुहागर विजापूर राज्यमहामार्गासाठी सोळा कोटी, महाबळेश्वर सातारा रहिमतरपूर रस्ता रुंदीकरणासाठी साठ कोटी रुपये, वाई – परखंदी – मुंगसेवाडी – चांदक – वेळे – सोळशी – नांदवळ – सोनके – पिंपोडे या रस्त्यांच्या कामासाठी 104 कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाच्या सहा प्रकल्पांची घोषणा भाजप नेते महेश शिंदे यांनी केली.

मोरणा, गुरेघर, तारळी, कुडाळी, वांग, या योजना प्रधानमंत्री कृषी योजनेतून केल्या जाणार आहेत. उरमोडी बळीराजा कृषी सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाकडून 968 कोटी राज्य शासनाकडून 4,432 कोटी असा एकूण 5310 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. धोम बलकवडी पाणी पूजन करण्यात येणार असून जिहे-कटापूर योजनेचे नामकरण गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजना असे करण्यात आल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.

 

दुकानदारी बंद झाल्याने काहींना पोटशूळ
कराड उत्तर व कोरेगाव तालुक्‍यात पोस्टर बॉयची हाकाटी सुरू झाली. या प्रश्नावर बोलताना महेश शिंदे म्हणाले, भाजपने सातारा जिल्ह्याला कोट्यवधीचा निधी दिला. खटाव व कोरेगाव तालुक्‍याला पेयजल योजनेचा 149 कोटींचा निधी देण्यात आला. जिहे-कटापूर योजना आता नव्या टप्प्यात आहे. दुष्काळी पट्टयात गेल्या पंधरा वर्षात झाले नाही ते होऊ लागल्याने पोपटपंची करणाऱ्यांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या असून भाजपच्या विकास धोरणाचा त्यांना पोटशूळ आला आहे, असा टोला शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या कोरेगावातील नेत्यांना लगावला.

आमदारकीच मुखत्यारपत्र कोणी दिलं?
आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपच्या नेत्यांवर सर्वांनाच इथे आमदार झाल्यासारखं वाटतंय अशी टीका केली होती. त्याचा समाचार घेताना दीपक पवार म्हणाले, आ. शिवेंद्रराजे काही आमदारकीच मुखत्यारपत्र घेऊन आलेले नाहीत. राजकीय महत्वाकांक्षा सर्वांनाच असते. साताऱ्यातील ब्रेक टेस्ट ट्रॅकसाठी आम्ही युनियनतर्फ सात निवेदने दिली होती. परिवहन मंत्री देशमुख असताना त्यांनी तेव्हाच दहा लाखांचा निधी मंजूर केला होता. आ. शिवेंद्रराजेंनी फुकटच्या कामाचे श्रेय लाटू नये. तशी त्यांना सवयच आहे. सातारकरांना खरं काय खोटं काय? हे सगळच समजतं असा टोला पवार यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

1 COMMENT

  1. कल्याण डोंबिवली ला ७००० करोड देणार होतात ४ वर्ष होत आली …नाशिक का पण १० हजार कोटी देणार होतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)