सातारा जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे पती-पत्नीचा मृत्यू

सातारा – तुटलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज(शनिवार) सकाळी सातारा जिल्ह्यातील निंबळक येथे घडली असून या घटनेमुळे परिसरात रोष व्यक्त केला जात आहे. दीपक रत्नसिंह मतकर आणि योगिता दीपक मतकर अशी मृत्यू झालेल्यादाम्पत्याची नावे आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या परिसरातील नागरिकांनी पालखी तळ येथील तुटलेल्या तारांची माहिती महावितरण विभागाला दोन दिवसांपूर्वी दिली होती. परंतु महावितरण विभागाने नागरिकांच्या या तक्रारींकडे कानाडोळा केला. त्यामुळे या तुटलेल्या तारांचा धक्का लागून मतकर दाम्पंत्यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून महावितरण यांच्या या चुकीचा रोष व्यक्त होत आहे. महावितरण विभागाच्या दुर्लक्षतेमुळेच दाम्पत्याचा मृत्यू झाला असा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)