सातारा जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

साताऱ्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस कार्यकर्त्यांची रॅली; वाहतुक व व्यापार सुरळीतपणे सुरू
बंदचे नेटिझन्समध्ये ट्‌विटर युध्द
सातारा – देशभरामध्ये इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने आज भारत बंदची हाक दिली. सातारा जिल्ह्यात मात्र महानगरांच्या तुलनेत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळा महाविद्यालये आणि दळणवळण यंत्रणा सुरूच राहिल्याने बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. मात्र शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मात्र परिणाम जाणवला.

फलटण वडूज सातारा कराड वाई येथे राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्षध आंदोलन करत बंदच्या आवाहनामध्ये जान फुंकण्याचा प्रयत्न केला. सातारा शहरातही फारसे काही बंदचे परिणाम जाणवले नाहीत. एसटी सेवा व रिक्षा सुध्दा सुरळीतरित्या सुरू होत्या कॉंग्रेसच्याया बंदला 21 विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होती. त्यामुळेच अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत आणि बिहारपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत होते. यामध्ये इंधन दरवाढ मागे घेण्याबरोबरच राजकीय घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र काही ठिकाणी या आंदोलनामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरुद्ध अर्थाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ भाजपनेच आपल्या औपचारिक ट्‌विटर हॅण्डलवरून ट्‌विट केला आहे.

भाजपने कॉंग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर ट्‌विट केलेल्या व्हिडीओमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि “राहुल गांधी मुर्दाबा’च्या घोषणा दिल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून भाजपने कॉंग्रेच्या आजच्या आंदोलनात मोदींचा जयघोष झाल्याचे ट्‌विट केले आहे. या ट्‌विटमध्ये भाजपने, कॉंग्रेसच्या भारत बंद आंदोलनात, राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा असे ट्‌विट केले आहे. या व्हिडीओला तासाभरात दहा हजारहून अधिक लाईक्‍स आणि हजारो रिट्‌विटस मिळाले आहेत.

देशभरामध्ये इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने आज भारत बंदची हाक दिली. सातारा जिल्हयात मात्र महानगरांच्या तुलनेत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शाळा महाविद्यालये आणि दळणवळण यंत्रणा सुरूच राहिल्याने बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. मात्र शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मात्र परिणाम जाणवला. फलटण वडूज सातारा कराड वाई येथे राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्षध आंदोलन करत बंदच्या आवाहनामध्ये जान फुंकण्याचा प्रयत्न केला. सातारा शहरातही फारसे काही बंदचे परिणाम जाणवले नाहीत. एसटी सेवा व रिक्षा सुध्दा सुरळीतरित्या सुरू होत्या कॉंग्रेसच्या या बंदला 21 विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला होती.

त्यामुळेच अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत आणि बिहारपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत होते. यामध्ये इंधन दरवाढ मागे घेण्याबरोबरच राजकीय घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र काही ठिकाणी या आंदोलनामध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरुद्ध अर्थाच्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ भाजपनेच आपल्या औपचारिक ट्‌विटर हॅण्डलवरून ट्‌विट केला आहे.

भाजपने कॉंग्रेसचे आंदोलन संपल्यानंतर ट्‌विट केलेल्या व्हिडीओमध्ये कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “नरेंद्र मोदी जिंदाबाद’ आणि “राहुल गांधी मुर्दाबा’च्या घोषणा दिल्याचे दिसत आहे. दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून भाजपने कॉंग्रेच्या आजच्या आंदोलनात मोदींचा जयघोष झाल्याचे ट्‌विट केले आहे. या ट्‌विटमध्ये भाजपने, कॉंग्रेसच्या भारत बंद आंदोलनात, राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा असे ट्‌विट केले आहे. या व्हिडीओला तासाभरात दहा हजारहून अधिक लाईक्‍स आणि हजारो रिट्‌विटस मिळाले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)