सातारा जिल्ह्यात एकूण 333 मि.मी. पाऊस

सातारा – जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 333.3 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 30.3 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 36.1 (581.6) मि. मी., जावली- 31.4 (1180.3) मि.मी. पाटण-44.4 (974.4) मि.मी., कराड- 32.7 (340.4)मि.मी., कोरेगाव- 14.3 (193.1) मि.मी., खटाव- 19.0 (283.3) मि.मी., माण-9.1 (230.3) मि.मी., फलटण- 2.6 (159.1) मि.मी., खंडाळा- 6.7 (232.6 ) मि.मी., वाई 25.9 (390.2) मि.मी., महाबळेश्वर-111.1 (4042.1) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 8607.3 मि.मी. तर सरासरी 782.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी 02162-232175 व 02162-232349 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)