सातारा जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना घरघर

संदीप राक्षे

सातारा – वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता व सातारा तालुक्‍यासह वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर या मोठ्या विधानसभा मतदारसंघात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कारभार वैद्यकीय अधिकारी नसल्याने नियोजन कोलमडले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कारभारी डॉ. कैलास शिंदे यांचे व्हिजन 2019 मध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा असताना डॉक्‍टरच परस्पर मुख्यालय सोडत असल्याने रुग्णांची परवड ही खाजगी दवाखान्यांच्या पथ्यावर पडली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना घरघर लागली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्याला आता वाई शहरात असणारे तालुका ग्रामीण रुग्णालयही अपवाद नाही. या रूण्गालयात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आलेल्या रूग्णांवर उपचार होत नाहीत. या रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णालयला घरघर लागली आहे. कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची करण्याची मागणी करूनही त्याकडे केले जात आहे. देशात स्वच्छतेमध्ये नंबर वन पटकाविणाऱ्या सातारा जिल्हा परीषदेचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाई रूग्णालय अखेरची घटका मोजत असतानाही जिल्हा परीषदेचे कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष व आरोग्य सभापती वंतराव मानकुमरे यांचे आरोग्य विभागाऐवजी ते बांधकाम खात्याकडे अधिक लक्ष देत असतात.

जनतेच्या आरोग्याची थट्टा!
गेल्या दोन वर्षांपासून एकही स्थायी वैद्यकीय अधिकारी व इतर कायमस्वरूपी सहकारी डॉक्‍टर या रुग्णालयाला मिळालेला नाही. त्यामुळे रूग्ण सेवेवर विपरीत परिणाम होवून सर्व सामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचे कसलेही सोयीरसुतक वाई तालुक्‍यातील राजकीय पुढारी-नेत्यांना नसल्याने जनतेतूनही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीत रुग्णालयाची सध्याची अवस्था पाहता गोरगरीब जनतेच्या आरोग्याची थट्टाच केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय खंडाळ्यात लोहोम, शिरवळ, भादे, लोणंद या प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्‍टर येतात आणि जातात याशिवाय  सातारा तालुक्‍यात बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधा नसल्यामुळे परवड आहे. जावली तालुक्‍यात काही केंद्रांवर पदे मंजूर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांची तेथे सेवा मिळत नाही. राज्य शासनाकडून हाफकिन मार्फत येणारा औषध पुरवठा आकसल्याने जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये सलाईनवर आली आहेत. त्यांना नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही अशी टिका भाजपच्या सदस्यामधून केली जात आहे.

दरम्यान वाई रूग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने वाई रूग्णालयाला घरघर लागली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना या ठिकाणी वेळेत उपचार मिळत नाहीत. या रूग्णालयात डॉक्‍टरच नसल्याने रूग्णांना खाजगीकडे उपचारासाठी जावे लागत आहे. खाजगीमध्ये पेशंटकडून लुटच केली जाते असे रूग्णांच्या नातेवाईकांकडून प्रतिक्रीया व्यक्त केल्या जातात. वाई ग्रामीण रूग्णालयाच्या सुविधांकडे सातारा जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. या रूग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार म्हणून मकरंद पाटील तुम्ही तरी प्रयत्न करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

मानकुमरेंचे लक्ष इतर खात्याकडे

वाई ग्रामीण रूग्णालयाला घरघर लागली असतानाही या रूग्णालयाला सोयी सुविधा देण्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्यापासून ते जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती वसंतराव मानकुमरे यांचेही या ठिकाणी दुर्लक्ष झाले असून त्यांचे लक्ष अन्य खात्यांकडे असते. विराजमान झालेले वसंतराव मानकुमरे सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था बिकट होऊन बसली आहे. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, अन्यथा याची किमंत तुम्हाला मोजावी लागेल अशी टिका विरोधी भाजप सदस्यांमधून केली जात आहे. वाई ग्रामीण रुग्णालयाकडे लवकरात लवकर सुधारणा करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)