सातारा- जिल्हा शासकीय रूग्णालयाला शनिवारी केंद्रीय समितीने भेट दिली. यावेळी रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागाची माहिती समितीने घेतली. यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य, जिल्हा शल्यचिकीत्सक, अति. चिकीत्सक यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सेंट्रल रिव्ह्यू मिशन या भारत सरकाच्या समितीने जिल्हा रूग्णालयाची पाहणी करत,थेट रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी समितीच्या सदस्यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन अतंर्गत चालणाऱ्या सर्व उक्रमांची माहिती घेतली. तसेच या उपक्रमाची पाहणी करताना समितीने त्यांच्या असलेल्या कक्षांची, कागदपत्रांची,पाहणी केली. त्यावेळी या उपक्रमांतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून उपक्रमाबाबत जाणून घेतले.

दरम्यान जिल्हा रुग्णालयातील सर्वच विभागांची पाहणी या समितीने केली. रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सातारा जिल्ह्यात दि.6 रोजी दाखल झालेली समिती जिल्हा रुग्णालयानंतर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)