सातारा जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे वार्षिक चर्चासत्र

कोरेगाव ः चर्चासत्रात उपस्थितांसमोर मार्गदर्शन करताना आ. दत्तात्रय सावंत.

मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर उपयुक्त मंथन : वेबसाईटचे अनावरण
(गुरूनाथ जाधव)
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय वार्षिक शैक्षणिक चर्चासत्राचे आयोजन कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात करण्यात आले होते. या चर्चासत्राला सातारा जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर उपयुक्त मंथन करणनयात आले.तसेच मुख्याध्यापक संघाच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, अध्यक्ष सचिन नलवडे, सुर्यकांत घाडगे, सचिव सुनिल गाडे, सुनिल जाधव, सहसचिव आसावरी अष्टपूत्रे यांनी केले होते.
जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शिक्षण क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी विचारवंत यांचे विचारमंथन व्हावे, यासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
शाळांमध्ये अद्यावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)