सातारा : जिल्हा बॅंकेकडून एक लाखापर्यंत कर्जमाफी

सातारा – सहकार क्षेत्रात आदर्श काम करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेने देशपातळीवर अनेक पुरस्कार सहकार व व्यवस्थापन क्षेत्रात प्राप्त केले आहेत. याबाबत राज्यात या बॅंकेचा नावलौकीक आहे. त्यात भर टाकण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे लाखभर कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सातारा जिल्हा बॅंकेने प्रथम घेतला असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष तथा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाना अर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने आणि बॅंकेने 1 लाख रूपये पर्यंतचे कर्ज किंवा 1 लाख रूपये मर्यादेपर्यंत त्यांच्या खात्यावरील कर्जाचा बोजा बॅंकेने स्वत: उचलून कर्जमुक्त करण्याचा निर्णय शेतकऱ्याच्या हितासाठी घेतला आहे. हा जिल्हा बॅंकेचा ऐतिहासकि निर्णय राज्यातील बॅंकिंग क्षेत्रात आदर्शवत ठरला आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

शेतकरी कुटूंबातील पिक व मध्यम मुदत कर्जाचे म्हणजे दीड लाख मर्यादेपर्यंत 27 हजार 959 सभासदांना 114 कोटी 79 लाख व दिड लाखावरील पिक व मध्यम मुदत कर्ज थकबाकी असलेल्या 1 हजार 310 सभासंदाना 14 कोटी 89 लाख आणि नियमित परतफेड करणारे लाभधारक सभासदांना प्रोत्साहनपर 236 कोटी 45 लाख रूपये योजना अंतर्गत बॅंकेस प्राप्त झाली असून त्याचे वितरणही करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतील पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 69 गावांना जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेच्यावतीने 1 कोटी 1 लाख रूपये निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)