सातारा: जिल्हा परिषद कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत

एप्रिल निम्मा संपला तरी मार्चचे वेतन नाही

सातारा – मार्च अखेरच्या धामधुमीनंतर अनेकांना अक्षय तृतीय या साडेतीन मुहर्तापैकी एक मुहर्त असलेल्या सणाकडे लक्ष लागते. पण यंदाच्या वर्षी सातारा जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी ते अंगणवाडी सहाय्यक यांना मार्च महिन्यातील वेतन व मानधन मिळाले नाही. त्यामुळे सुमारे अठरा हजार कर्मचारी वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. पुढील आठवड्यात सर्वांना वेतन मिळावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती जि. प. चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून 58 वर्षापुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यामुळे ग्रामीण भागात विकासाच्या योजना पोहचल्या. त्याचबरोबर ठेकेदार व नोकरी प्राप्त करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळाली आहे. राज्य शासनाचे नियंत्रण असलेल्या जिल्हा परिषदेतून अनेकजण आमदार, खासदार व मंत्री झाले. तो खरा अर्थाने सुवर्णकाळ होता. आता सध्या तीन आठवडे होवून सुध्दा मार्च महिन्याचे वेतन सातारा जिल्हा परीषदेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. 14 हजार 500 अधिकारी, लिपीक, तांत्रिक कामगार, व चतुर्थश्रेणी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना वेतन मिळालेले नाही. तर दुसऱ्या बाजुला चलन तुटवड्यामुळे सातारा जिल्ह्यातील बॅंकाच्या एटीएम यंत्रणेमध्ये खडखडाट जाणवू लागलेला आहे.

अक्षय तृतीयेला अनेकजण नवीन वस्तु व खेरदी करीत असतात. परंतु सध्या सोने गहाण ठेवण्याची वेळ सातारा जिल्हा परीषदेच्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. मार्च अखेरमुळे कोषागारामध्ये शासनाच्या विविध विभागाचे मागणीपत्र व धनादेश येवून पोहचले आहेत. परंतु वरीष्ठ पातळीवरून अद्याप आदेश न आल्यामुळे सातारा जिल्हा परीषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. आता हात उसणे घेवून काहींना आपला संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांना सणासुदीसारखे मार्च अखेर ऍडव्हांन्स द्यावा, अशी मागणी आता कर्मचारी संघटनेच्या वतीने पुढे येवू लागली आहे. कर्मचारी संघटनेचे नेते काका पाटील, कास्टाईबचे सुशीलकुमार कांबळे, रोस्टर चळवळीचे संदिप फणसे व जि. प. कर्मचारी संघटनेचे प्रशांत तुपे, ज्ञानेश्‍वर पवार यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन दिले जाते त्यांची सातारा जिल्ह्यात सहा हजार इतकी संख्या आहे. त्यांनाही मानधन मिळालेले नाही. पुढील आठवड्यात नक्कीच सर्वाचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होईल, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांनी पत्रकारांना माहिती दिल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)