सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कैलास शिंदे

सातारा – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मंत्रालयातील मुख्यमंत्री कक्षाचे उपसचिव कैलास शिंदे यांची वर्णी लागली असून याचे आदेश सामान्य प्रशासन विभागातून सायंकाळी सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला प्राप्त झाले.

विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने बदली झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील उपसचिव कैलास शिंदे यांची नुकतीच महसुल व्यतिरिक्‍त खात्यातून आयएएस म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांनी मंत्रालयातून डेस्क ऑफिसर या पदापासून आपल्या शासकीय सेवेला प्रारंभ केला. तब्बल 22 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणाऱ्या शिंदे यांनी आधी उपसचिव आणि आता सीईओ पदापर्यंत मजल मारली. ते प्रशिक्षण पूर्ण करुन लवकरच कार्यभार स्वीकारतील.

डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देशमुख यांनी काम केले. आयएसएस पदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आलेख उंचावत गेला. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना या योजनांची दखल अवघ्या 14 महिन्यात देशपातळीवर घेतली गेली. आजी-माजी सीईओंनी एकमेकांचे अभिनंदन केले. कैलास शिंदे लवकरच पदभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)