सातारा जिल्हा परिषदेचा पंतप्रधानांनी केला गौरव

स्वच्छ सर्वेक्षणात पटकाविला पहिला क्रमांक
नवी दिल्ली- केंद्र शासनाच्या ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक पटकाविलेल्या सातारा जिल्हा परिषदेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर व मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी पुरस्कार स्विकारला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथील सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेच्या कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018 पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेश, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्य मंत्री रमेश जिगाजीनागी मंचावर उपस्थित होते. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्‍यामलाल गोयल कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच या कार्यक्रमास 68 देशातील प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 मोहिमेअंतर्गत दि. 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत देशभरातील सर्वच 718 जिल्हयांमध्ये स्वच्छतेच्या विविध निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यांतील निवडक गावे याप्रमाणे 6 हजार 980 गांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील 34 जिल्हयांमधील 540 गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात विविध मानकांमध्ये सरस ठरून सर्वाधिक गुण संपादन करणारा सातारा जिल्हा देशात प्रथम आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सातारा हा राज्यात प्रथम प्रमाणित हागणदारी मुक्त जिल्हा आहे. स्वच्छतेबाबत लोकजागृती व्हावी आणि लोकांचा सक्रीय सहभाग असावा यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न केले. स्वच्छतेच्या सवयी आपल्या अंगी बाळगण्याचे उपक्रम राबविले. या स्वच्छ अभियानामध्ये विविध शासकीय विभागाने, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी तसेच महिलांनी मोठी जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच सातारा जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला,
संजीवराजे ना. निंबाळकर

सातारा जिल्हा 2016 मध्येच हागणदारी मुक्त जिल्हा म्हणून प्रमाणित झाला होता. पुढचा टप्पा हा घन, द्रव्य कच-याचे व्यवस्थापनाचा होता.राज्य शासनाने प्लास्टीक बंदीचा घेतलेला निर्णय साता-यात जिल्ह्यात राबविण्यासाठी, बचत गटांनी मोठी जबाबदारी पेलली असून जिल्ह्यातील 750 बचत गट कापडी पिशवी तयार करतात. यातून बचत गटांना दर महिन्याला 7 ते 7.5 हजार रूपयांचे उत्पन्न होत आहे.
कैलाश शिंदे

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)