सातारा जिल्हा परिषदेचा आज दिल्लीत गौरव

सातारा- देशात राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये पहिला क्रामंक पटकाविलेल्या सातारा जिल्हा परिषदेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार दि.2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी 10.45 वाजता राष्ट्रपती भवन, दिल्ली येथील सांस्कृतिक हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. त्यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रिय राज्यमंत्री मनोज सिन्हा, हरदीपसिंग पुरी हे उपस्थित राहणार असून यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे पुरस्कार स्विकारणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)