सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे आंदोलन

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा केवळ घोषणेपुरता असून त्याची अंमलबजावणी होत नाही. या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत सातारा येथील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, तसेच इलेक्‍ट्रॉनिक मिडिया असोसिएशनचे पत्रकार तसेच छायाचित्रकार उपस्थित होते.
व इलेक्‍ट्रॉनिक मिडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, कायदा आमच्या हक्काच्या… अशा विविध घोषणा देत पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. यानंतर जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांच्यासमोर पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी राज्यातील पत्रकारांमध्ये असंतोष आहे. समाजावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत. परंतु, पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. यामुळे पत्रकार असुरक्षित झाले आहेत. या कायद्याची कठोर अंमलबजावणी होण्याची गरज आहे. पत्रकारांना पेन्शन देण्याची घोषणा सरकारने केली आहे, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. त्याशिवाय सरसकट सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती पत्राचे वाटप करावे. मजिठिया आयोगाची अंमलजावणी करावी. छोट्या वृत्तपत्रांना संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून संपवण्याचा प्रयत्न चालला आहे. सरकारच्या जाहिरातविषयक धोरणामुळे छोटी वृत्तपत्र बंद पडू शकतात. माध्यमे हा लोकशाहीचा चौथा खांब असल्याचे मानले जाते. परंतु, सर्व समाजावरील अन्यायासाठी लढणारा हा चौथा खांब टिकण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने पत्रकार संरक्षण कायदा, मजिठिया आयोग यांची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्‍न मार्गी लावावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी पत्रकारांच्या मागण्या मुख्यमंत्री तसेच राज्य शासनापर्यंत पोहोचवू असे आश्‍वासन यावेळी पत्रकारांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)